नागपूर शहरात सन 1864 साली नगरपालिका स्थापन झाली व त्या बरोबर लोक प्रतिनिधींना सिमित अधिकार प्राप्त झाले. प्रारंभी साफ-सफाई दिवाबत्ती, बाजार, प्राथमिक शिक्षण यासाठी शासकीय अनुदानातून नागरी सोई उपलब्ध करून दिल्या जात. त्यावेळी नागपूर नगरपालिकेचे क्षेत्र 15.5 चै.कि.मी. असून 82,000 एवढी लोकसंख्या होती. तदनंतर 1922 मध्ये नगरपालिकेचे सर्व कामे सुचारूपणे पार पाडण्यासतव मध्यप्रांत व-हाड नगरपालिका अधिनियम तयार करण्यात आले होते.